पुणे – इमारतीच्या पाचव्या मजल्याचे बांधकाम सुरू असताना मजूर पडून ठार झाल्याची घटना येवलेवाडीतील निर्मल स्केअर साईटवर घडली. कामगारांच्या सुरिक्षततेबाबत हलगर्जीपणा बाळगल्याप्रकरणी बांधकाम ठेकेदारासह मजूर ठेकेदाराविरूद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलकमल गुरूगोपाल चक्रवर्ती (वय ४३, रा. नांदेड फाटा, सिंहगड रस्ता) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येवलेवाडीतील निर्मल स्केअर बांधकाम साईटचे काम सुरू आहे. दोन दिवसांपुर्वी सकाळी दहाच्या सुमारास इमारतीच्या पाचव्या मजल्यावर सेंट्रींगचे काम सुरू होते. त्यावेळी निलकमल काम करीत असताना खाली पडून त्यांचा मृत्यू झाला.
बांधकामवेळी कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कोणतेही खबरदारी न घेतल्याप्रकरणी दोन्ही ठेकेदारांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद तपास करीत आहेत.