पुणे – बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या दुसर्या मजल्यावरून पडून एका मजूरचा मृत्यू झाला. सोनु कुमार (वय.25,रा. लेबर कॅम्प निंबाळकर नगर लोहगाव) असे मजूराचे नाव आहे. ही घटना 26 जून रोजी निर्वाना लाईफ सिटी स.न. 298 बि. विंग न्याती बिल्डींगजवळ पोरवाल रोड लोहगाव येथे दुपारी अडीचच्या सुमारास घडली.
याप्रकरणीर ठेकेदार देवानंद वाडेकर (रा. मुंजाबा वस्ती) याच्यावर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहायक पोलिस फौजदार नामदेव विठ्ठल सुपे (वय.52) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत सोनु कुमार हा इतर कामगारांसोबत 26 जून रोजी काम करत होता. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर लाकडी मटेरीयल शिफ्टींगचे काम सुरू होते. काम करत असताना दुसर्या मजल्यावरून पाय घसरल्याने सोनू लिफ्टच्या डक्टमध्ये खाली पडला.
यावेळी डोके,छाती, पोट व हाताला गंभीर मार लागला होता. उपचारासाठी त्याना नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रात्री पावने आठच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
सुरुवातीला याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान चौकशीअंती कागदपत्राचे अवलकन केले असता, संबंधीत ठेकादार वाडेकर याने त्याच्या बांधकाम साईटवर काम करीत असलेल्या कामगारांच्या सुरक्षिततेसाठी लिफ्टच्या शेजारी असलेल्या डकला सुरक्षा जाळी न लावता हलगर्जी व निष्काळजीबाळगून काम करून घेत असताना सोनू याचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार वाडेकरवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिस उपनिरीक्षक ए.आर.गांधले यांनी सांगितले.