बिबवेवाडी – पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमची मतं जाणून घेण्यासाठी मी तुमच्या दारात आले आहे. माझ्यासोबत तुम्हीही प्रचारात सहभागी असल्याने आपण सर्वजण मिळून पर्वतीला परिपूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहू या. आपल्या पर्वती मतदारसंघातील वाढती गुन्हेगारी कमी करणे.
महाविद्यालयीन तरुण, अल्पवयीन मुले यांच्यात जनजागृती तसेच सर्वत्र सीसीटीव्ही लावण्यासह रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवण्यात पुढाकार घेणार आहे. महिला, तरुणींना सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी स्वरक्षणाचे धडे रणरागिणी पथकाची निर्मिती करणार असल्याचे मत महाविकास आघाडी उमेदवार अश्विनी कदम यांनी व्यक्त केले.
महाविकास आघाडी उमेदवार अश्विनी कदम यांचा प्रभाग क्र. 36 लोअर इंदिरानगर, मार्केटयार्डतील शनी मंदिरापासून पद यात्रेला सुरुवात करण्यात आली. इंदिरानगर ओढ्यालगत श्री गौड ब्राह्मण समाज मंगल कार्यालय,कुंभार वस्ती,नीलकमल वसाहत, शिवशंकर वसाहत, पापळ वस्ती परिसर बिबवेवाडी आदी भागातील पदयात्रा आणि महिलांना अश्विनी कदम यांनी संबोधित केले.
तुतारी वाजवणारा माणूस चिन्हा समोरील बटण दाबून पर्वतीत महिलाराज परिवर्तन घडणार असल्याचा संकल्प यावेळी महिलांनी बोलून दाखवला. यावेळी मोठ्या संख्येने महाविकास आघाडी व इंडिया फ्रंटचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. महिला आणि नागरिकांची संख्या पदयात्रे दरम्यान मोठ्या संख्येने होती.