पुणे – पाणी टाक्‍या उभारण्याची मुदत हुकणार?

पुणे – शहरामध्ये 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी विविध भागांत 82 टाक्‍या उभारण्याचे काम करण्यात येत आहे. यापैकी 30 टाक्‍यांची कामे विविध कारणास्तव धिम्या गतीने सुरू आहेत. यामध्ये काही टाक्‍याचे काम सुरूच झाले, नाही तर 16 टाक्‍यांची कामे बंद आहेत. प्रत्यक्षात मार्च 2019 मध्ये हे काम पूर्ण होणे आवश्‍यक होते. आता, यासाठी 20 जानेवारी 2020 ची कामाची अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आता ही मुदत हुकण्याची शक्‍यता आहे.

शहराच्या विविध भागांमध्ये पाणीवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. यासाठी संपूर्ण शहरात विविध ठिकाणी साठवण टाक्‍या बांधण्यात येत आहेत. सुरूवातीला 103 पैकी 82 टाक्‍यांची कामे हाती घेण्यात आली. असे असले, तरी काही टाक्‍यांच्या कामासाठी अद्याप भूसंपादनच करण्यात आले नाही. 245 कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून तीन वर्षांत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. 10 लाख लिटरपासून 90 लाख लिटरपर्यंत या टाक्‍यांची क्षमता आहे.

अधीक्षक अभियंता नंदकुमार जगताप म्हणाले, “काही टाक्‍यांची कामे संथ गतीने सुरू आहेत. याविषयी संबंधित ठेकेदाराला याची माहिती कळवण्यात आली आहे. काही ठिकाणी कामगार मिळत नसल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.