पुणे – करोना प्रतिबंधक लसींचे मंगळवारी केवळ कोवॅक्सिनचे डोस मिळणार असून, प्रत्येक केंद्रावर अडीचशे डोसचे नियोजन करण्यात आले आहे. मंगळवारी कोविशील्ड मिळणार नाही.
8 वर्षांवरील सर्व नागरिकांना शुक्रवारी कोवॅक्सिनचा जो पहिला डोस मिळणार आहे, त्यातील 15 टक्के लस ही ऑनलाइन बुकिंग करून, तर 15 टक्के ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल.याशिवाय 26 जुलैला कोवॅक्सिनचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे, त्या 18 वर्षांवरील नागरिकांना मंगळवारी 35 टक्के लस ऑनलाइन बुकिंगद्वारे तर 35 टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल. दिव्यांग आणि गर्भवतींना ऑन दी स्पॉट नोंदणी करून डोस दिला जाईल.
येथे मिळेल लस
येरवडा- राजीव गांधी रुग्णालय
कोथरूड- कै. जयाबाई सुतार दवाखाना
कर्वेनगर- कै. बिंदूमाधव ठाकरे दवाखाना
गाडीखाना- कै. मालती काची दवाखाना
महंमदवाडी- कै. दशरथ भानगिरे दवाखाना
मंगळवारपेठ – कमला नेहरू रुग्णालय
ससून सर्वोपचार रुग्णालय