पुणे – संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी पुन्हा बंद

पुणे – येत्या गुरुवारी (दि.13) रोजी उपनगरांसह संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असून, शुक्रवारी (दि.14) उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. महापालिकेच्या पर्वती जलकेंद्र पंपिंग, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे आणि नवीन होळकर पंपिंग येथील पंपिंग, स्थापत्य विषयक देखभाल आणि दुरुस्तीची कामे करायची असल्याने पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे कळवण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.