पुणे – पाण्याच्या वादामुळे ता. ना. मुंडेंची बदली

पुणे – जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता ता. ना. मुंडे यांची राज्य सरकारने औरंगाबाद येथे बदली केली आहे. त्यांच्याजागी जल व सिंचन विभागाचे मुख्य लेखापरीक्षक राजेंद्रकुमार मोहिते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जलसंपदा विभाग आणि पुणे महापालिका यांच्यात सुरू असलेल्या वादाचे पडसाद उमटू लागले असून यातूनच मुंडे यांची बदली करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

मुंडे यांनी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशाचा आधार घेत पुणे महापालिकेला 8.16 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी घ्यावे लागेल, अशी भूमिका घेतली होती. त्यावरून जलसंपदा आणि पुणे महापालिका यांच्यात वाद उफाळून आला होता. ही कोंडी फोडण्यासाठी राज्य सरकारने अखेर मुंडे यांची बदली करण्याचा मार्ग स्वीकारला आहे.
मुंडे यांची मोहिते यांच्या जागेवर बदली करण्यात आली असून, याठिकाणी तत्काळ हजर राहण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. याबाबतचा आदेश राज्य सरकारने मंगळवारी काढला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)