पुणे – येरवडा गुंजन चौकात रस्त्यावर पाणी

पुणे – येरवडा येथील क्षेत्रीय कार्यालयाच्या समोर रस्त्यावर ड्रेनेजचे पाणी साचले होते. मेट्रोचे काम सुरु असल्याने ड्रेनेज लाईन तुटल्याची नागरिकांनी शक्यता वर्तवली आहे. तत्पूर्वी, शनिवारीसुद्धा अशीच परिस्थिती होती. मोठया प्रमाणात रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

काही दुचाकीमध्ये पाणी गेल्याने बंद पडत होत्या.क्षेत्रीय कार्यालयाच्या समोरच असा प्रकार होत असूनही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून यावर काहीच उपाय केला जात नसल्याने नारिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.  ड्रेनेज लाईनचे काम शनिवारी केले होते.मात्र आज पुन्हा ड्रेनेजलाईन चोकउप झाली असल्याने पुन्हा ही परिस्थिती निर्माण झाली.लवकरात लवकर काम सुरु केले जाईल चंद्रकांत गवळी कनिष्ठ अभियंता ,पुणे महानगरपालिका

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.