पुणे – विधी महाविद्यालय रस्त्यावरील प्रसार भारती एफटीआयआयच्या कामात अडथळा ठरणारी 800 मिमी व्यासाची जलवहईनी स्थलांतरीत करण्यात येणार असल्याचे येत्या गुरूवारी (दि. 30 ) रोजी कोथरूड परिसराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी उशीरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा सुरळीत केला जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पाणी पुरवठा बंद असलेला भाग – डहाणुकर कॉलनी, रामबाग कॉलनी, सुतारदरा, किष्कींदानगर, जयभवानीनगर कोथरूड गावठाण आणि इतर परिसर