पुणे : वानवडी पोलिसांनी पकडला 29 लाखाचा गुटखा

पुणे – वानवडी पोलिसांनी 29 लाखाचा गुटखा व प्रतिबंधात्मक पानमसाला पकडला आहे. याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

गणपतसिंग राजपूत (रा.कोंढवा),रेवणनाथ निंबाळकर( हडपसर), हेमंत, निजाम, मिथून नवले(गणेश पेठ),प्रकाश परिहार(रा.कोंढवा) अशी आरोपींची नावे आहे. त्यांच्याकडून प्रतिबंधात्मक पान मसाला व वाहतूक करणारा ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे.

ही कारवाई भौरोबानाला ते लुल्लानगर चौकात शुक्रवारी करण्यात आली. याप्रकरणी पोलीस हवालदार राजू रासगे यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींनी राज्यात गुटखा बंदी असतानासुध्दा तीची वाहतूक, साठवण आणी विक्री करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक भोलेनाथ अहिवळे करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.