पुणे – अनधिकृत होर्डिगमुळे वानवडी विद्रुप

वानवडी – वानवडी परिसरातील रस्त्यावर अनेक ठिकाणी अनधिकृत होर्डिंगचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे शहराच्या विद्रुपीकरणात भर पडत आहे. मोठ्या प्रमाणात अनधिकूत फलेक्‍स असूनही त्यावर महानगरपालिका आणि प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे.

फ्लेक्‍समध्ये मोठे अर्थकरण असून पुण्यातील होर्डिंगच्या दुघर्टनेनंतरही आकाशचिन्ह विभाग अशा अनधिकृत होर्डींगवर कारवाईस करण्यास दुर्लक्ष करत असल्याचे येथील स्थानिक नागरिकांनी सांगितले. वानवडी रस्त्यावरील फातीमानगर चौकात वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सिग्नल आहे. या चौकात वाहनचालक सिग्नलसाठी थांबत असतात त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्याच रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात फलेक्‍स व होर्डिंग उभारण्यात आले आहेत.

अनधिकूत फ्लेक्‍सचे पेव फुटले आहे. फ्लेक्‍ससाठी उभे करण्यात आलेले लोखंडी खांब सुद्धा गंजलेले आहेत. याच होर्डींगच्या खालच्या बाजूस मोठ्या प्रमाणात व्सावसायिकांच्या लोखंडी टपऱ्या उभारण्यात आल्या आहेत. महानगरपालिका सर्वेक्षण अपुर्ण आहे. अनधिकूत होर्डींगवर प्रशासन कारवाई करीत नसल्याचे या परिसरातील नागरिकांनी सांगितले आहे. हे होर्डींग जास्त प्रमाणात रस्त्याच्या बाजुला चौका-चौका मध्ये असल्याने तेथे वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. परवाना असलेल्या होर्डींगच्या खालील बाजूस परवाना क्रमांकाची पिवळी पाटी लावली जाते मात्र असा परवाना असलेल्या पाटया तुरळकच दिसत आहेत. अनेक व्यावसायिक स्वत:च्या व्यवसायाच्या जाहीरातीचे मोठ-मोठे फ्लेक्‍स, बॅनर, चौकाचौकात, मुख्य आणि अंतर्गत रस्त्यावर देखील लावत आहेत. पुणे शहरात दुर्घटना घडून झालेल्या अपघातात विनाकारण अनेकांना जीव गमवावा लागला. अशा या घटनेनंतरही वानवडी परिसरातील चौकाचौकातील अनधिकृत होर्डींगवर कारवाई झाले नसल्याचे दिसत आहे. अशा दुर्घटना घडून अजून किती नागरिकांना जीव गमवावा लागणार आहे असा सवाल या परिसरातील वाहनचालकांनी केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.