पुणे : भिकोबा गुरव हरवले आहेत; कोणाला आढळल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा

पुणे – भिकोबा यशवंत गुरव (वय 90) हे बुधवारी सकाळी पावणे आठ वाजल्यापासून बेपत्ता झाले आहेत. ते राहात असलेल्या वर्षा अपार्टमेंट, बी/02, अजिंक्‍य पार्क, पॅनकार्ड क्‍लब रोड, बाणेर येथील घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेले आहेत. त्यांना विस्मृतीचा आजार आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी व नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला आहे. मात्र अद्याप ते आढळून आलेले नाहीत.

गुरव यांचा वर्ण गोरा आहे. डोक्‍यावर निळ्या रंगाची जुन्या पद्धतीची टोपी, पांढरा शर्ट, क्रीम रंगाचा पॅंट, पायात चॉकलेटी रंगाची चप्पल असा त्यांचा पेहराव आहे. संबंधीत वृद्ध व्यक्ती कोणाला आढळल्यास त्यांनी चतुःशृंगी पोलिस ठाणे, पोलिस हवालदार डी.बी.काटम यांच्याशी किंवा गुरव यांचा नातू ओंकार गुरव (मोबाई क्रमांक – 9730444954) यांच्याशी संपर्क साधावा.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.