पुणे : शहरात वाहन तोडफोडीचे सत्र कमी व्हायचे नाव घेत नाही. गुरुवारी रात्री टिंगरेनगर येथे पुन्हा एकदा ४ वाहनांची तोडफोड करण्यात आली. दोन सोसायट्यांच्या आवारातील ४ कारच्या काचा फोडण्यात आल्या.
या दोन्ही सोसायट्यांतील सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्यामुळे फुटेज मिळू शकले नाही. सकाळी साडेआठ वाजता ही बाब नागरिकांच्या लक्षात आली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.