पुणे – वाहन पासिंग प्रक्रिया आता अधिकाऱ्यांपर्यंत “लाइव्ह’

 “वाहन 4.0′ या प्रणालीचा विकास करण्याचे आदेश


चुकीचे काम करणारे कर्मचारी कचाट्यात सापडणार

पुणे – वाहनांच्या पासिंग प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रण आता थेट प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना पाहता येणार आहे. त्याचबरोबर “वाहन 4.0′ या प्रणालीचा विकास करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आदेश राज्य सरकारने प्रादेशिक परिवहन कार्यालयांना दिले आहेत.

उच्च न्यायलयामध्ये दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने वाहनांच्या पासिंगच्या कामकाजाचे “व्हिडिओ चित्रण’ करण्याची सूचना केली होती. त्यानुसार अनेक कार्यालयांत हे चित्रीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली होती. आता ते चित्रिकरण थेट अधिकारी पाहू शकणार आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत होणाऱ्या वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देण्याच्या कामकाजावर आता प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना लक्ष ठेवता येणार आहे.

या प्रक्रियेसाठी ब्रेक परीक्षक, वायू प्रदूषण परीक्षक, हेड लाइट बीम विश्‍लेषक आदी उपकरणांची गरज आहे. यासाठी आवश्‍यक यंत्रणा विकसित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर चित्रिकरणासाठी आवश्‍यकता असल्यास मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना राज्य सरकारने परिवहन कार्यालयांना दिल्या आहेत.

वाहन पासिंग अनियमिततेची सखोल चौकशी करण्यासाठी जानेवारी 2018 मध्ये सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली होती.या समितीचा अहवाल सप्टेंबर 18 मध्ये राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. या अहवालातील शिफारशी स्वीकृत करून त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कायद्यांतील तरतुदींच्या आधारे आणि नियमभंग करून चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत शिस्तभंगाची कारवाई प्राधान्याने करण्यात यावी, असेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.