Pune Vegetable Prices – गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (दि. २५) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली होती. मागणीच्या तुलनेत आवक जास्त झाल्याने टोमॅटो आणि शेवग्याच्या भावात घसरण झाली असून, काकडीच्या भावात वाढ झाली, तर अन्य सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर होते. विविध भाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये कर्नाटक, मध्य प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे १२ ते १३ टेम्पो, कर्नाटक येथून कोबी ४ ते ५ टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा ३ ते ४ टेम्पो राजस्थानातून गाजर सुमारे १४ ते १५ टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा ३ ते ४ टेम्पो, भुईमूग कर्नाटक आणि गुजरातमधून प्रत्येकी एक टेम्पो मध्य प्रदेश, राजस्थानातून मटार २५ ते २६ टेम्पो, कर्नाटक येथून पावटा ३ टेम्पो, तामिळनाडू येथून तोतापुरी कैरी १ टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसणाची सुमारे १० ते १२ टेम्पो तर इंदूर, आग्रा आणि स्थानिक भागातून बटाटा ३० ते ३५ टेम्पो इतकी आवक झाली होती. कांदा १७५ टेम्पो इतकी आवक झाली तर स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे ५०० ते ५५० गोणी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, हिरवी मिरची ५ ते ६ टेम्पो, गवार ३ ते ४ टेम्पो, टोमॅटो १० ते १२ हजार क्रेट्स, काकडी ५ ते ६ टेम्पो, संग्रहित छायाचित्र… फ्लॉवर १० ते १२, ढोबळी १० ते १२ मिरची, तांबडा भोपळा १४ ते १५ टेम्पो गाजर ३ ते ४ टेम्पो, घेवडा ५ ते ६ टेम्पो, पावटा ३ ते ४ टेम्पो, कांदा सुमारे १७ टेम्पो आवक झाली होती.फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : १००-१५०, बटाटा : ७०-१४०, लसूण : ५००-१२००, आले सातारी : ३००-५००, भेंडी : ३००-५००, गवार : ७००-१०००, टोमॅटो : १००-१५०, दोडका : ३५०-४५०, हिरवी मिरची : ५००-७५०, दुधी भोपळा : १००-१५०, चवळी : २००-३००, काकडी : ४००- ४५०, कारली : हिरवी ४००-४५०, पांढरी : ३००-३५०, पापडी : ३००-३५०, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : १००-२००, कोबी : ७०- १४०, वांगी : २००-४००, डिंगरी : ३५०-४००, नवलकोल : १००- १२०, ढोबळी मिरची : ४००- ५००, तोंडली : कळी : ५००-५००, जाड : २००-२५०, शेवगा : ५००-१०००, गाजर : ५००-१०००, वालवर : २५०-३००, बीट : १००-२००, घेवडा : ३००-४००, कोहळा : १००-१५०, आर्वी: २५०-३००, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २५०-३००, भुईमूग शेंग : ७००-९००, मटार : परराज्य मटार : २६० ते ३००, पावटा : ३००- ३५०, तांबडा भोपळा : १००-२५०, तोतापुरी कैरी : १८००-२०००, सुरण : २००- २२०, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००- १६००.