पुणे – पती-पत्नीच्या नात्यातील गोडवा वाढावा, प्रेम वाढावे, एकोपा वाढावा यासाठी येथील कौटुंबिक न्यायालयात “व्हॅलेनटाईन डे’ साजरा करण्याची मागणी ऍड. वाजेद खान (बिडकर) यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन कौटुंबिक न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना देण्यात आले आहे.
14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेनटाईन डे आहे. हा दिवस संपूर्ण जगभर प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे व्हॅलेनटाईन डे साजरा करावा. या दिवशी कार्यक्रमाचे आयोजन करावे, अशी ऍड. खान यांनी केली आहे.