पुणे : लसी संपल्या…केवळ कोवॅक्सिन देणार तेही चारच केंद्रांवर

केवळ कोवॅक्सिन मिळणार असून ते देखील 18 ते 44 वर्षे वयोगटासाठी राखीव असणार

पुणे : पुण्यातील कोविशील्डचा साठा संपला असून, शनिवारी केवळ चारच केंद्र सुरू राहणार आहेत. तेथेही केवळ कोवॅक्सिन मिळणार असून ते देखील 18 ते 44 वर्षे वयोगटासाठी राखीव असणार आहेत.

महापालिकेने शुक्रवारी तब्बल 111 केंद्र सुरू ठेवत सुमारे 19 हजार जणांना लस दिली. परंतु शनिवारसाठी आता लसच शिल्लक नसल्याने शनिवारी चारच केंद्र सुरू ठेवण्यात येणार असल्याचे महापालिकेने कळवले आहे.

शनिवारी 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण बंदच असणार आहे. मात्र चार केंद्रांवर केवळ 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लस उपलब्ध असेल. त्यातूनही पाहिला डोस असल्याने कोवॅक्सिन ची व्यवस्था येथे करण्यात आली आहे.

ही आहेत ती चार केंद्रे

1) अण्णासाहेब मगर हॉस्पिटल, हडपसर – 500 डोस
2) जयाबाई सुतार दवाखाना, कोथरूड – 500 डोस
3) मुरलीधर लायगुडे हॉस्पिटल, धायरी – 500 डोस
4) ससून हॉस्पिटल, स्टेशन – 200 डोस

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.