पुणे – करोना प्रतिबंधक लसीचे गुरुवारी 199 केंद्रांवर नियोजन असून, दोन्ही लस उपलब्ध असणार आहेत. कोविशिल्डचे 188 केंद्रांवर प्रत्येकी 250 डोस उपलब्ध करून देण्यात आले असून, कोवॅक्सीनचे 11 केंद्रांवर प्रत्येकी 400 डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय, 75 तासांचे अविरत लसीकरणही दोन केंद्रांवर आणखी एक दिवस सुरू ठेवले आहे.
18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोविशिल्डचा जो पहिला डोस मिळणार आहे त्याच्या ऑनलाइन बुकिंगची टक्केवारी 10 टक्के असून, ऑन दी स्पॉट बुकिंगही 10 टक्के आहे. तर, कोवॅक्सीनचा जो पहिला डोस मिळणार आहे. त्यातील 10 टक्के लस ही ऑनलाइन बुकिंग करून तर 10 टक्के ऑन दि स्पॉट नोंदणी करून मिळेल.
21 जुलैपुर्वी पहिला डोस घेतलेल्या 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना जी लस मिळणार आहे त्याचे ऑनलाइन बुकिंग 40 टक्के, तर 40 टक्के ऑन दि स्पॉट बुकिंग होणार आहे. 16 सप्टेंबरला कोवॅक्सीनचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्या 18 वर्षांवरील नागरिकांना 40 टक्के लस ऑनलाइन बुकिंगद्वारे, तर 40 टक्के लस ही ऑन दि स्पॉट नोंदणी करून मिळेल. दिव्यांग आणि गरोदर महिलांनाही ऑन दि स्पॉट नोंदणी करून प्राधान्याने लस दिली जाणार आहे. याशिवाय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही प्राधान्याने लस देण्यात येणार आहे.