पुणे – करोना प्रतिबंधक लसीचे गुरुवारी 68 केंद्रांवर नियोजन करण्यात आले आहे. यात कोवॅक्सिनचे केंद्र 11 असतील. कोविशील्डचे 57 केंद्रांवर प्रत्येकी 120 डोस उपलब्ध असतील. कोवॅक्सिनचे 300 डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
नागरिकांना कोविशील्डचा जो पहिला डोस मिळणार आहे, त्याच्या ऑनलाइन बुकिंगची टक्केवारी 10 टक्के असून, ऑन दी स्पॉट बुकींगही 10 टक्के आहे. तर कोवॅक्सिनचा जो पहिला डोस मिळणार आहे त्यातील 10 टक्के लस ही ऑनलाइन बुकिंग करून तर 10 टक्के ऑन दि स्पॉट नोंदणी करून मिळेल.
30 जूनपूर्वी पहिला डोस घेतलेल्यांना ऑनलाइन बुकिंग 40 टक्के, तर 40 टक्के ऑन दी स्पॉट बुकींग होणार आहे. 26 ऑगस्टला कोवॅक्सिनचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे, त्यांना गुरूवारी 40 टक्के लस ऑनलाइन बुकिंगद्वारे तर 40 टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल.
दिव्यांग आणि गरोदर महिलांनाही ऑन दि स्पॉट नोंदणी करून प्राधान्याने लस दिली जाणार आहे. याशिवाय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही प्राधान्याने लस देण्यात येणार आहे.