पुणे- करोना प्रतिबंधक लसीचे बुधवारी 68 केंद्रांवर नियोजन करण्यात आले असून, दोन्ही लसी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोवॅक्सिनचे केंद्र अकराच असतील.
कोविशिल्डचे 57 केंद्रांवर प्रत्येकी 120 डोस उपलब्ध करून देण्यात आले असून, कोवॅक्सिनचे 400 डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
नागरिकांना कोविशिल्डचा जो पहिला डोस मिळणार आहे, त्याच्या ऑनलाइन बुकिंगची टक्केवारी 10 टक्के असून, ऑन दी स्पॉट बुकिंगही 10 टक्के आहे. तर कोवॅक्सिनचा जो पहिला डोस मिळणार आहे त्यातील 10 टक्के लस ही ऑनलाइन बुकिंग करून तर 10 टक्के ऑन दि स्पॉट नोंदणी करून मिळेल.
29 जूनपूर्वी पहिला डोस घेतलेल्यांना ऑनलाइन बुकिंग 40 टक्के, तर 40 टक्के ऑन दी स्पॉट बुकींग होणार आहे. 25 ऑगस्टला कोवॅक्सिनचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे, त्यांना बुधवारी 40 टक्के लस ऑनलाइन बुकिंगद्वारे तर 40 टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल. दिव्यांग आणि गरोदर महिलांनाही ऑन दि स्पॉट नोंदणी करून प्राधान्याने लस दिली जाणार आहे.