पुणे-शहरात शुक्रवारी 163 केंद्रांवर कोविशील्ड, तर 15 ठिकाणी कोवॅक्सिन लस उपलब्ध असणार असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे, दरम्यान, या दोन्ही ठिकाणी दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तर लस बुकिंगसाठीचे स्लॉट सकाळी 8 वाजता सुरू होणार आहेत.
आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कोविशील्डचे 40 टक्के डोस 45 वर्षे वयाच्या पुढील नागरिकांना दुसरा डोस घेतलेले हे लाभार्थी असतील.त्यांच्यासाठी त्यांनी 26 मार्चपूर्वी लस घेतलेली असणे आवश्यक आहे, तर 40 टक्के डोस हे ऑनलाइन बुकिंग करून आलेल्या 45 वर्षांपुढील नागरिकांसाठी असणार आहेत.
तर 20 टक्के डोस हे फ्रंटलाइन वर्करसाठी तसेच दिव्यांगासाठी असतील. तर 15 ठिकाणी कोवॅक्सिनचे डोस उपलब्ध असून, त्यात 18 वर्षांवरील ज्या नागरिकांनी 20 मेपूर्वी पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना प्राधान्य देण्यात येणार असून ऑनलाईन बुकिंगद्वारे आलेल्या 60 टक्के नागरिकांना देण्यात येणार आहेत.