Pune : …तीन दिवसांच्या ब्रेकनंतर आज लसीकरण
Updated On:

पुणे – करोना प्रतिबंधक लसीकरणाच्या मोहिमेत तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी दोन्ही कंपन्यांचे लस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दोन्ही मिळून 195 केंद्रांवर लसीकरण होणार आहे. प्रत्येक केंद्रांवर कोविशिल्डचे 200 तर कोवॅक्सिनचे 300 डोस मिळतील.
कोविशिल्ड लस ही 188 केंद्रांवर तर कोवॅक्सिन ही लस 7 केंद्रांवर उपलब्ध असणार आहे. 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोविशिल्डचा जो पहिला डोस मिळणार आहे त्याच्या ऑनलाइन बुकिंगची टक्केवारी जी 20 टक्के होती ती 15 टक्के करण्यात आली आहे. तर ऑन दी स्पॉट बुकिंगची टक्केवारी 20 वरून 15 टक्के करण्यात आली आहे. तर कोवॅक्सिनचा जो पहिला डोस मिळणार आहे, त्यातील 20 टक्के लस ही ऑनलाइन बुकिंग करून तर 20 टक्के ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल.





