पुणे  – लसीकरण यंत्रणा हतबल!

पुणे  – करोना प्रतिबंधक लसीकरणाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात डॉक्‍टरांसह हेल्थ वर्कस आणि अन्य फ्रंटलाइन वर्कर्सना पहिल्या टप्प्यातील लसीकरण पूर्ण करण्यात आले. यानंतर ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. पण, यात अनेकांना दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. तर, आरोग्य विभागाकडे लस पुरवठा आणि साठाच नसल्याने यंत्रणा हतबल आहे.

मोहीम सुरू झाल्यानंतर पहिले दोन महिने लसीकरण सुरळीत सुरू होते. मात्र, जसजसे लाभार्थींची संख्या वाढू लागली, तसा लस पुरवठा कमी होऊ लागला. तोपर्यंत जिल्ह्यात लसीकरण केंद्रांची संख्या 200 पार गेली होती. हेल्थ आणि फ्रंटलाइन वर्कर यांनी लसीचा पहिला डोस घेतला. मात्र, मार्च महिन्यात ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतला, त्यांना दुसऱ्या डोससाठी वाट पहावी लागत आहे.

पर्यायाने हेल्थ वर्कर्समध्ये केवळ 54 टक्के, तर फ्रंटलाइन वर्करमध्ये 68 टक्के लाभार्थींनी दुसरा डोस घेतला आहे.60 वर्षांपुढील 78 टक्के लाभार्थींचा पहिला डोस झाला तर त्यातील केवळ 9 टक्के लाभार्थींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 ते 60 वयोगटातील केवळ 38 टक्के लाभार्थींनी पहिला डोस घेतला असून, त्यातील 2 टक्के लाभार्थींनी दुसरा डोस घेतला आहे. मात्र, उर्वरित लाभार्थी प्रतीक्षेत आहेत.

कोवॅक्‍सिनचा तुटवडा कायम
कोव्हिशील्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 45 ते 60 दिवसांत दुसरा डोस घ्यावा. तर, कोवॅक्‍सिन लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 28 ते 42 दिवसानंतर दुसरा डोस घ्यावा, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, लसीचा पुरवठाचा उपलब्ध होत नसल्यामुळे काहींना उशिरा दुसरा डोस घ्यावा लागत आहे. त्यामध्ये कोवॅक्‍सिन लसीचे डोस कमी प्रमाणात येत आहेत. त्यामुळे या लाभार्थींना लसीसाठी शोधमोहीम करावी लागत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.