पुणे- करोना प्रतिबंधक लसीचे बुधवारी कोवॅक्सिन आणि कोविशील्ड दोन्ही लस उपलब्ध करून देण्यात आले असून, दोन्ही मिळून 66 केंद्रांवर लसीकरण होणार आहे. याशिवाय बुधवारसाठी प्रत्येक केंद्रांवर कोविशील्डचे डोस वाढवले असून, एका केंद्रावर 200 जणांना लस मिळेल.
कोविशील्ड लस ही 60 केंद्रांवर तर कोवॅक्सिन ही लस 6 केंद्रांवर उपलब्ध असणार आहे. कोवॅक्सिनचे प्रत्येक केंद्रांवर 300 तर कोविशील्डचे 200 डोस उपलब्ध असतील.