पुणे – करोना प्रतिबंधक लसीचे मंगळवारी 198 केंद्रांवर नियोजन करण्यात आले असून, दोन्ही लसी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
कोविशील्डचे 187 केंद्रांवर प्रत्येकी 200 डोस उपलब्ध करून देण्यात आले असून, कोवॅक्सिनचे 11 केंद्रावर प्रत्येकी 350 डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सर्व नागरिकांना कोविशील्डचा जो पहिला डोस मिळणार आहे, त्याच्या ऑनलाइन बुकिंगची टक्केवारी 15 टक्के असून, ऑन दी स्पॉट बुकींगही 15 टक्के आहे. तर कोवॅक्सिनचा जो पहिला डोस मिळणार आहे त्यातील 15 टक्के लस ही ऑनलाइन बुकिंग करून, तर 15 टक्के ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल.
22 जूनपूर्वी पहिला डोस घेतलेल्या मंगळवारी जी लस मिळणार आहे त्याचे ऑनलाइन बुकिंग 35 टक्के तर 35 टक्के ऑन दी स्पॉट बुकींग होणार आहे. 17 ऑगस्टला कोवॅक्सीनचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्या नागरिकांना 35 टक्के लस ऑनलाइन बुकिंगद्वारे तर 35 टक्के लस ही ऑन दीस्पॉट नोंदणी करून मिळेल.