पुणे- शहरात शनिवारसाठी कोवॅक्सिन आणि कोविशील्ड या करोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दोन्ही मिळून 195 केंद्रांवर लसीकरण होणार आहे. कोवॅक्सिनचा डोस दिल्या जाणाऱ्या एकूण सात केंद्रांमध्ये प्रत्येकी 500 जणांना लसीचा डोस देण्यात येणार आहे.
कोविशील्ड लस ही 188 केंद्रांवर तर कोवॅक्सिन ही लस 7 केंद्रांवर उपलब्ध असणार आहे. 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोविशील्डचा जो पहिला डोस मिळणार आहे, त्यातील 15 टक्के लस ऑनलाइन बुकिंग करून तर 15 टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल. तर कोवॅक्सिनचा जो पहिला डोस मिळणार आहे, त्यातील 20 टक्के लस ही ऑनलाइन बुकिंग करून तर 20 टक्के ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल.