पुणे – करोना प्रतिबंधक लसीकरणाच्या मोहिमेत शुक्रवारी 196 केंद्रांवर लसीकरण होणार आहे. प्रत्येक केंद्रांवर कोविशिल्डचे 230 तर कोव्हॅक्सीनचे 400 डोस मिळतील.
कोविशिल्ड लस ही 185 केंद्रांवर तर कोव्हॅक्सीन ही लस 11 केंद्रांवर उपलब्ध असणार आहे. 18 वर्षावरील सर्व नागरिकांना कोविशिल्डचा जो पहिला डोस मिळणार आहे त्याच्या ऑनलाइन बुकींगची 15 टक्के तर ऑन दि स्पॉट बुकींगही 15 टक्के आहे.
कोव्हॅक्सीनचा जो पहिला डोस मिळणार आहे त्यातील 15 टक्के लस ही ऑनलाइन बुकींग करून तर 15 टक्के ऑन दि स्पॉट नोंदणी करून मिळेल. 10 जून पूर्वी पहिला डोस घेतलेल्या 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना शुक्रवारी जी लस मिळणार आहे, त्यात 35 टक्के ऑन दि स्पॉट तर 35 टक्के बुकींग करून मिळणार आहे.