पुणे –करोना प्रतिबंधक लसीकरणाच्या मोहिमेत दोन्ही मिळून 194 केंद्रांवर लसीकरण होणार आहे. प्रत्येक केंद्रांवर कोविशील्डचे 220 तर कोवॅक्सिनचे प्रत्येकी 500 डोस मिळतील.
कोविशील्ड लस ही 188 केंद्रांवर, तर कोवॅक्सिन ही लस 7 केंद्रांवर उपलब्ध असणार आहे. 18 वर्षावरील सर्व नागरिकांना कोविशील्डचा जो पहिला डोस मिळणार आहे, त्याच्या ऑनलाइन बुकिंगची टक्केवारी 15 टक्के आहे. तर ऑन दी स्पॉट बुकींची टक्केवारीही 15 टक्के आहे. तर कोवॅक्सिनचा जो पहिला डोस मिळणार आहे, त्यातील 15 टक्के लस ही ऑनलाइन बुकिंग करून तर 15 टक्के ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल.
दि. 7 जूनपूर्वी पहिला डोस घेतलेल्या 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना सोमवारी जी लस मिळणार आहे, ती 35 टक्के ऑनलाइन तर 35 टक्के ऑन दी स्पॉट बुकिंग करता येणार आहे. 3 ऑगस्टला कोवॅक्सिनचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे, त्या 18 वर्षांवरील नागरिकांना सोमवारी 35 टक्के लस ऑनलाइन बुकिंगद्वारे तर 35 टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल. दिव्यांग आणि गरोदर महिलांनाही ऑन दी स्पॉट नोंदणी करून प्राधान्याने लस दिली जाणार आहे.