पुणे – करोना प्रतिबंधक लसीचे सोमवारी “कोवॅक्सिन’ आणि “कोविशील्ड’ दोन्ही लस उपलब्ध करून देण्यात आले असून, दोन्ही मिळून 191 केंद्रांवर लसीकरण होणार आहे.
कोविशील्ड लस ही 185 केंद्रांवर तर “कोवॅक्सिन’ ही लस 6 केंद्रांवर उपलब्ध असणार आहे. “कोवॅक्सिन’चे प्रत्येक केंद्रांवर तीनशे तर कोविशील्डचे 100 डोस उपलब्ध असतील.
18 वर्षावरील सर्व नागरिकांना कोविशील्डच जो पहिला डोस मिळणार आहे, त्यातील 40 टक्के लस ऑनलाइन बुकिंग करून तर 20 टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल. तर “कोवॅक्सिन’चा जो पहिला डोस मिळणार आहे त्यातील 20 टक्के लस ही ऑनलाइन बुकिंग करून तर 20 टक्के ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल.
2 मे पूर्वी पहिला डोस घेतलेल्या 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना सोमवारी 20 टक्के लस ऑनलाइन बुकिंग करून तर 20 टक्के ऑन दी स्पॉट दुसरा डोस दिला जाईल. यासोबतच 28 जूनला “कोवॅक्सिन’चा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे, त्यांना नागरिकांना सोमवारी 40 टक्के लस ऑनलाइन बुकिंगद्वारे तर 20 टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल.
तर, दिव्यांग आणि गरोदर महिलांनाही ऑन दी स्पॉट नोंदणी करून प्राधान्याने लस दिली जाणार आहे, असे मनपा आरोग्य विभागाने सांगितले आहे.