पुणे विद्यापीठाचा 633 कोटींचा अर्थसंकल्प

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 2019-20 या आर्थिक वर्षाचा 585 कोटी जमेचा आणि 633 कोटी खर्चाचा अर्थसंकल्प अधिसभेत सादर करण्यात आला. एकूण 47 कोटी 79 लाख 50 हजार रुपयांचा तुटीच्या अर्थसंकल्पास अधिसभेत मंजूर करण्यात आला.

कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या अधिसभेत काही स्थगन प्रस्तावानंतर व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे यांनी विद्यापीठाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार व अधिसभा सदस्य उपस्थित होते. गतवर्षी विद्यापीठाचा अर्थसंकल्प 659 कोटी खर्चाचा, तर 61 कोटी तुटीचा होता. यंदा मात्र गतवषीच्या तुलनेत 27 कोटी कमी खर्चाचा अर्थसंकल्प मांडला गेला. त्यामुळे खर्च कमी करण्यावर विद्यापीठाने भर दिल्याचे दिसून येत आहे.

खर्चविषयक नवीन तरतुदी
* दीक्षान्त सभा मंडप : 3 कोटी
* पुस्तकाचे पुनर्प्रकाशन : 10 लाख
* पोस्ट डॉक्‍टरल फेलोशिप : 2 कोटी
* रिसर्च पार्क : 83 लाख
* स्कूल ऑफ डिझाईन : 31 लाख
* अपंगाच्या सोयी व सुविधा : 10 लाख
* नवीन अभ्यासक्रम : 67 लाख
* बांबू हस्तकला केंद्र : 22 लाख
* डेटा सेंटर केंद्र : 65 लाख

अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी
* विद्यापीठातील इमारत बांधकाम : 53 कोटी 37 लाख
* गुणवत्ता सुधार कार्यक्रम : 18 कोटी 20 लाख
* विद्यार्थ्यांच्या योजना, अंमलबजावणी : 33 कोटी 58 लाख
* विद्यार्थी विकास मंडळ : 13 कोटी 16 लाख
* आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण : 2 कोटी
* विद्यार्थी विमा व आपत्कालीन सहाय्य : 45 लाख
* विद्यार्थी सॉफ्टस्किल प्रोग्राम : 35 लाख

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.