पुणे: ऑनलाईन ‘मॉक टेस्ट’चे तीन-तेरा, विद्यार्थी गोंधळले

ताॆत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी हैराण

पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 10 एप्रिलपासून होणाऱ्या ऑनलाईन परिक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांची मॉक टेस्ट घेण्य़ात आली. मात्र  ही मॉक टेस्ट सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे विद्यांर्थी हैराण झाले होते.

विद्यापीठाकडून एक टेक्स्ट मेसेज पाठवण्यात आला होता. त्यात युजर आयडी आणि पासवर्ड देण्यात आला होता. मात्र अनेकदा लॉग ईन करण्य़ात सुद्धा अडचणी  विद्यार्थ्यांना येत होत्या. त्यामुळे अनेकांना ही मॉक टेस्ट सोडवण्यासाठी विलंब झाला.

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षांना 10 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सत्र परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना हा एकच पर्याय उपलब्ध आहेत. बहुपर्यायी प्रश्‍न पद्धतीने ही परीक्षा होणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.