समाजशास्त्र विभागाच्या प्रवेशप्रक्रियेवर प्रश्‍नचिन्ह

गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून अचानक घेतली मागे,

काही विभागांकडून निकषांचे पालन होत नसल्याची तक्रार

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात विविध पदव्युत्तर विषयांच्या एमए, एमएस्सी, एमकॉम प्रथम वर्ष प्रवेशप्रक्रिया सुरू आहेत. प्रत्येक विभाग आपआपल्या स्तरावर ही प्रवेशप्रक्रिया राबवत असून, यात कोणतही सुसूत्रता नसल्याचे दिसून येत आहे. विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाने प्रवेशाची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली आणि अचानक ती मागे घेतल्यानेही या विभागाच्या प्रवेशप्रक्रियेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे.

पुणे विद्यापीठाच्या विभागांमध्ये प्रवेश घेण्यासाठी मोठी स्पर्धा असते. विद्यापीठाच्या काही विभागांकडून प्रवेश परीक्षा घेऊन त्यामधील गुणांच्या आधारे प्रवेश दिला जातो. तर, काही विभागांमध्ये बीए, बीकॉमला मिळालेल्या गुणांच्या आधारे प्रवेश दिला जातो. ही गुणवत्ता यादी प्रसिध्द करताना त्यासाठी असलेल्या निकषांचे पालन काही विभागांकडून होत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून होत आहे.

समाजशास्त्र विभागाने 20 जुलै रोजी “एमए’ प्रथम वर्ष प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर केली होती. मात्र त्यानंतर 23 जुलै रोजी अचानक त्यांनी एक परिपत्रक प्रसिध्द करून ही गुणवत्ता यादी मागे घेत असल्याचे जाहीर केले. तांत्रिक कारणांमुळे ही गुणवत्ता यादी मागे घेण्यात आल्याचे विभागाचे म्हणणे आहे. मात्र यामुळे विद्यार्थ्यांचा मोठा गोंधळ उडाला आहे. गुणवत्ता यादी प्रसिध्द करतानाच ती काळजीपूर्वक तयार करणे आवश्‍यक होते, त्यामुळे विद्यार्थ्यांना झालेला त्रास वाचला असता, अशी संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांमधून होत आहे. दरम्यान, विद्यापीठाच्या सर्व विभागाच्या प्रवेशप्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)