पुणे – माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा गुरुवारी (दि.3) होणारा ऑनलाइन पदवीप्रदान समारंभ स्थगित करण्यात आला आहे. पुढील तारीख लवकरच कळविण्यात येईल, असे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
करोनामुळे यंदा ऑनलाइन पद्धतीने गुरुवारी सायंकाळी 4.30 वाजता हा समारंभ होणार होता. यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे अध्यक्षपद भूषविणार होते.
फोर्ब्स मार्शल प्रा.लि.चे सहअध्यक्ष डॉ. नौशाद फोर्ब्स हे प्रमुख अतिथी म्हणून सहभागी होणार होते. मात्र, आता हा कार्यक्रम स्थगीत करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर येत्या 15 दिवसांत पोस्टाद्वारे पदवी प्रमाणपत्र पाठविण्यात येणार आहे.