पुणे – छोट्या व्यावसायिकांना पुणे विद्यापीठाचे प्रोत्साहन

पुणे  -करोनाकाळात लहान व्यावसायिक व ठेकेदारांना काम मिळावे, या दृष्टिकोनातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पुढाकार घेतला आहे. विद्यापीठात रेसिडेन्शिअल आणि नॉन रेसिडेन्शिअल असे दोन इमारतींचे प्रकार आहेत. यामध्ये विद्युत आणि स्थापत्य विभागाची कामे सुरू असतात.

ती आजवर मोठ्या व अनुभवी ठेकेदारांना मिळत असत. मात्र, करोनाकाळात अनेक छोटे व्यावसायिक, ठेकेदारांच्या हातची कामे गेली. या काळात त्यांना मदतीची गरज असल्याने विद्यापीठाकडून या व्यावसायिकांसाठी टेंडर काढण्यात येत आहे. यातील नागरी विभागांतर्गत कामांचे टेंडर या आधीच काढले असून, येत्या आठ दिवसांत विद्युत विभागाचेही टेंडर काढण्यात येणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या “इमारत काम समिती’च्या बैठकीत या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी टेंडरच्या अटी शिथिल केल्या आहेत, असे स्थावर विभागाचे अधिकारी राजेंद्र पाटील यांनी सांगितले. विद्युत आणि स्थापत्य विभागातील टेंडर हे  hrt://{mahatenderr.gr].in   या संकेतस्थळावर पाहता येतील, असे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.