छान! पुणे विद्यापीठालाही समजले गुळवेल वनस्पतीचे महत्त्व

संशोधन प्रकल्पाचा प्रारंभ : 2 लाख गुळवेल रोपांची करणार निर्मिती

पुणे- आयुर्वेदात अमृतासमान मानलेल्या “गुळवेल’ या औधषी वनस्पतीच्या संशोधन प्रकल्पाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात करण्यात आले. या प्रकल्पात “गुळवेल’ वनस्पतींची दोन लाख रोपे तयार करून दिली जाणार असून, या वनस्पतीविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.

गुळवेल या वनस्पतीची देश विदेशात वाढत मागणी वाढत असून, ते उपयुक्त आहे. या वनस्पतीची लागवड व त्याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. यासाठी “जीवनासाठी अमृता’ मिशन अंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वनस्पतीशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. दिगंबर मोकाट यांना राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, आयुष मंत्रालय भारत सरकारकडून या प्रकल्पासाठी निधी प्राप्त झाला आहे.

त्याचे उद्घाटन कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांचे हस्ते झाले. यावेळी गुळवेल रोपे लागवड, रोपे निर्मिती कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.

विद्यापीठाचे वित्त व लेखा विभाग प्रमुख अतुल पाटणकर, प्रकल्प प्रमुख डॉ. दिगंबर मोकाट, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अविनाश आडे, स्थावर विभागाचे आर. व्ही. पाटील, आरोग्यशास्त्र विभागातील प्रा. डॉ. टिल्लु, वनस्पतीशास्त्र विभागाचे माजी प्राध्यापक डॉ. के. एन. धुमाळ व इतर मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.