#Video पुणे :वनाज ते आनंदनगर मेट्रोची ट्रायल रन

पुणे – पुणे महापालिका हद्दीत प्रथमच शुक्रवारी मेट्रोची ट्रायल रन होत आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवतील. शिवाय, त्यांच्याच हस्ते पुणे मेट्रो कोच प्रतिकृतीचे अनावरण करण्याचे हिल व्ह्यू पार्क कार डेपो (वनाज), कोथरूड येथे होणार आहे. त्यामुळे पुणेकरांच्या दृष्टीने इतके दिवस कागदावर असलेली मेट्रो आता प्रत्यक्ष धावणार आहे.

https://www.facebook.com/edainikprabhat/videos/207338167994113

पुणे मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन 24 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. राज्य आणि केंद्र सरकारचा हा संयुक्‍त प्रकल्प आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कामाची सुरवात 3 मे 2017 रोजी सुरू झाली. या मेट्रो प्रकल्पाची मार्गिका एकूण 33.28 कि.मी. असून त्यात 30 स्थानके आहेत. त्याती 27.20 कि.मी. मार्गिका उन्नत असून 6.08 कि. मी. मार्ग भुयारी असेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.