पुणे : दहा रुपयांत दिवसभर करा गारेगार प्रवास

पुणे – शहरातील पेठांमध्ये आता 10 रुपयांत दिवसभर कोठेही वातानुकुलित (ए.सी.) बसमधून प्रवास करता येणार आहे. यासाठी महापालिका 50 बस खरेदी करणार असून, मार्च अखेरपर्यंत त्या रस्त्यांवरून धावतील यादृष्टीने प्रयत्न केले जाणार असल्याचे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी मंगळवारी सांगितले. या मिडी बस खरेदीचा प्रस्ताव मंगळवारी स्थायी समितीत मंजूर करण्यात आला.

खासगी वाहनांची वाढती संख्या, अरुंद रस्त्यांमुळे मध्यवर्ती भागातील कोंडी टाळण्यासाठी तसेच खासगी वाहनांचा वापर कमी व्हावा, यासाठी या बस घेण्यात येणार आहेत. या मिडी बस असून, या प्रत्येक बसची किंमत 26 लाख 95 हजार 185 रुपये आहे. या 50 बस खरेदीसाठी महापालिकेने 13 कोटी 47 लाख 59 हजार 250 रुपये खर्चाला मंगळवारी मंजुरी दिली.

पुणे स्टेशन, स्वारगेट, त्याचबरोबर सर्व पेठांचा भागामध्ये नागरिकांसाठी ही सेवा उपलब्ध होणार आहे. भविष्याचा विचार करून शहराच्या अन्य भागातही भविष्यात ही योजना राबवण्यात येईल, असे रासने यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.