मालवाहतूकदारांचे आंदोलन सातव्या दिवशीही सुरूच

पुणे – डिझेलचे दर कमी करावेत, राष्ट्रीय स्तरावर समान मूल्य निर्धारित करावे आणि डिझेलचे दर तीन महिन्यांनी संशोधन करून ठरवावेत, अशा विविध मागण्यांसाठी देशभरात ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट कॉंग्रेसच्या वतीने दि. 20 जुलैपासून चक्काजाम आंदोलन सुरू आहे. यात शहरातील वाहतूक संघटनांनीही सहभाग घेतला आहे. गुरूवारी आंदोलनाच्या सातव्या दिवशी शहरातील संघटनांनी ठिकठिकाणी बंद पाळला असून जोवर मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत बंद सुरू राहणार असल्याचे संघटनांनी म्हटले आहे.

ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट कॉंग्रेसच्यावतीने 20 जुलैला देशव्यापी चक्का जाम आंदोलन पुकारण्यात आले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील सर्व बस वाहतूक संघटनांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. 20 तारखेपासून शहरातील विविध संघटना यामध्ये सहभागी झाल्या आहेत. यामुळे स्टाफ ट्रान्सपोर्ट बस, पॅकेज टूर करणाऱ्या बसेस तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसह त्यांची कार्यालये बंद आहेत. यामुळे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. मात्र, जोपर्यंत केंद्र शासन मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे संघटनाकडून सांगण्यात आले. आंदोलनामध्ये शहरातील महाराष्ट्र राज्य वाहन चालक-मालक संघटना, बस ओनर्स असोसिएशन, डिस्ट्रीक्‍ट मोटार गुडस ट्रान्सपोर्ट, महाराष्ट्र राज्य ट्रक, टॅम्पो, टॅंकर बस वाहतूक महासंघ आदींनी सहभाग घेतला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)