पुणे – करोना विषाणूंच्या संपूर्ण मानव जातीवर संकट आले असून सर्वत्र जनजिवन विस्कळीत झाले असून व्यापारउदीम देखील ठप्प झाले आहेत. असंख्य नागरीकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा वेळी पुणे पोलीसांचा सच्च्या माणुसकीचा अन भावनिक मानवतेचा चेहरा पुणे आलाय.
पुणे शहरातील दानशुरांच्या मदतीने पुणे शहर वाहतूक शाखेचे समुपदेशन विभागामार्फत गेल्या आठवड्यापासून सर्वसामान्य गरजू नागरीक, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक व महीलांसाठी फुड पॅकेट्स, ड्राय राशन, पाणी, मास्क, हॅन्ड ग्लोव्हज, यांचे मोफत वाटप करण्यात येत आहे. तसेच भयग्रस्त नागरीकांचे वैयक्तिक पातळीवर समुपदेशन करुन मनोधैर्य वाढविण्याचे अविरत प्रयास करण्यात येत आहे.
पुण्यातील किन्नर समाजही या अभुतपूर्व संकटात सापडलाय. संपुर्ण बाजारपेठ बंद असल्याने व उदरनिर्वाहासाठी अन्य साधन नसल्याने या घटकातील काही व्यक्तींवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. हि बाब लक्षात घेऊन पोलीसांनी तात्काळ मंगलमुखी किन्नर चॅरीटेबल ट्रस्ट, गणेश पेठ, पुणे या किन्नरांसाठी धर्मादाय काम करणाऱ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करुन त्यांचेमार्फत या समुदायाच्या सदस्यांना आवश्यक ते वाहतूक परवाने, वाहने पुरवून फुड पॅकेट्स, ड्राय राशन, पाणी, मास्क, हॅन्ड ग्लौव्हज, वगैरे अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरू केलेला आहे.
वाहतूक विभागाचे अपर पोलीस आयुक्त, डॉ. संजय शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली समुपदेशन विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक व त्यांच्या प्रोअॅक्टिव्ह स्टाफने सदरची जबाबदारी समर्थपणे सांभाळत किन्नर समाजाच्या सदस्यांना मदतीचा हात दिला आहे. याबाबत मंगलमुखी किन्नर चॅरीटेबल ट्रस्टच्यावतीने पदाधिकारी लाची, मनिषा, आशिका यांनी आभार व्यक्त केले आहे.