ऑनलाइन पद्धतीने सात-बारा वाटपात पुणे अव्वल

पुणे – नागरिकांना अधिकाधिक सुविधा ऑनलाइन पद्धतीने देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यादृष्टीने भूमि अभिलेख विभागाकडून सात-बारा, आठ “अ’ आणि ई-फेरफार आदी दस्ताऐवज ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येत आहे.

मागील काही दिवसांत ऑनलाइन पद्धतीने 50 लाख 66 हजार डिजिटल सातबारे आणि फेरफार नागरिकांना मिळाले आहेत, अशी माहिती राज्याचे ई-फेरफार प्रकल्प समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली.

पुणे महसूल विभागातील पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यात सर्वाधिक सात-बारा, आठ “अ’ आणि ई-फेरफार यांचे वाटप करण्यात आले आहे. याठिकाणी प्रशासकीय यंत्रणेने राबविलेल्या उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला आहे. तसेच दैनंदिन सात-बारा उतारे वाटपाची संख्या राज्यातील उर्वरित जिल्ह्यांपेक्षा पुणे जिल्ह्यात सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात 4 लाख 7 हजार 611 डिजिटल सातबारे नागरिकांना देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.