पुणे – शहरात मंगळवारी कोवॅक्सिन लसीचे डोस सात केंद्रांवर मिळणार असून, त्यातील सहा केंद्रांवर एक हजार आणि एका केंद्रावर पाचशे डोसचे नियोजन करण्यात आले आहे.
18 वर्षांवरील सर्व नागरिकांना मंगळवारी कोवॅक्सिनचा जो पहिला डोस मिळणार आहे, त्यातील 20 टक्के लस ही ऑनलाइन बुकिंग करून, तर 20 टक्के ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल.
ज्या नागरिकांना ऑफलाइन ऑन दि स्पॉट लस घ्यायची आहे त्यांना सकाळी 10 ते दुपारी तीन या वेळेत लस देण्यात येईल. तसेच ऑनलाइन बुकींग करून अपॉइंटमेंट घेतलेल्या नागरिकांना दुपारी तीन ते रात्री आठ या वेळेत लस देण्यात येईल.
- डोस मिळण्याचे केंद्र
- येरवडा- राजीव गांधी रुग्णालय
- कोथरूड- कै. जयाबाई सुतार दवाखाना
- कर्वेनगर- कै. बिंदूमाधव ठाकरे दवाखाना
- गाडीखाना- कै. मालती काची दवाखाना
- महंमदवाडी- कै. दशरथ भानगिरे दवाखाना
- मंगळवारपेठ – कमला नेहरू रुग्णालय
- ससून रुग्णालय