पुणे – करोना प्रतिबंधक लसीचे गुरूवारी कोविशील्ड आणि कोवॅक्सिन दोन्ही लसींचे डोस उपलब्ध करून देण्यात आले असून, दोन्ही मिळून 190 केंद्रांवर लसीकरण होणार आहे.
कोविशील्ड लस ही 184 केंद्रांवर तर कोवॅक्सिन ही लस 6 केंद्रांवर उपलब्ध असणार आहे.
कोवॅक्सिनचे प्रत्येक केंद्रांवर 300 तर कोविशील्डचे 100 डोस उपलब्ध असतील. 18 वर्षावरील सर्व नागरिकांना कोविशील्डचा जो पहिला डोस मिळणार आहे, त्यातील 40 टक्के लस ऑनलाइन बुकिंग करून तर 20 टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल.
तर कोवॅक्सिनचा जो पहिला डोस मिळणार आहे, त्यातील 20 टक्के लस ही ऑनलाइन बुकिंग करून तर 20 टक्के ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल. दि.28 एप्रिलपूर्वी पहिला डोस घेतलेल्या 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना गुरूवारी 20 टक्के लस ऑनलाइन बुकिंग करून तर 20 टक्के ऑन दी स्पॉट दुसरा डोस दिला जाईल.
तर, 23 जूनला कोवॅक्सिनचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे, त्या 18 वर्षांवरील नागरिकांना गुरूवारी 40 टक्के लस ऑनलाइन बुकिंगद्वारे तर 20 टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल. दिव्यांग आणि गरोदर महिलांनाही ऑन दी स्पॉट नोंदणी करून प्राधान्याने लस दिली जाणार आहे, असे मनपा आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.