पुणे : सराईत चोरट्यास सापळा रचून अटक

कोंढवा पोलिसांनी केला अडीच लाखाचा ऐवज हस्तगत
पुणे –
कोंढवा पोलिसांनी सराईत गुन्हेगारास सापळा रचून जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून घरफोडीच सुमारे अडीच लाखाचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये सोन्या चांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. निजाम शेख ( 23 रा. अशोक नगर कोंढवा बुद्रुक) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार पोलिस नाईक अमित साळुंखे व पोलिस अंमलदार ज्योतिबा पवार यांना शेख संदर्भात खबर मिळाली होती. त्यानूसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक चेतन मोरे,पोलिस हवालदार रमेश गरुड, नवले ,पोलिस नाईक निलेश वनवे.संजीव कळंबे, सुदाम वावरे,पोलिस अंमलदार किशोर वळे, आदर्श चव्हाण यांनी मिठानगर येथे शेखला ताब्यात घेतले.

त्याला पोलिसी खाक्‍या दाखवताच त्याने दोन घरफोडीच्या गुन्हयाची कबुली दिला. त्याच्या ताब्यातून प्रत्येकी 1 लाख 7 हजार व 1 लाख 40 हजाराचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले.

ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलिस उपायुक्त नम्रता पाटील , सहायक पोलिस आयुक्त कल्यानराव विधाते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील, पोलिस निरीक्षक महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.Pune: Thief arrested in Sarait

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.