पुणे – आंदोलनाचा रुग्णसेवेवर कोणताही परिणाम नाही

जहॉंगिर रुग्णालय प्रशासनाचे स्पष्टीकरण

पुणे – जहॉंगिर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन उभारले आहे. यामुळे पहिल्या दिवशी रुग्णसेवा काहीशी विस्कळीत झाली. परंतू, आंदोलनाची पूर्वकल्पना असल्यामुळे व्यवस्थापनाकडून सर्व उपाययोजना करण्यात आली. त्यामुळे रुग्णांना फारसा फटका बसला नाही. दरम्यान, रुग्णालयात चतुर्थ श्रेणीपासून द्वितीय श्रेणीपर्यंत 1 हजार 150 कर्मचारी आहेत. त्यातील 360 जण आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे अन्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून रुग्णसेवा सुरळीत असल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाने म्हटले आहे.

जहॉंगिर रुग्णालय 350 बेडचे असून, सध्या काही विभागाचे नूतनीकरण सुरू असल्यामुळे रुग्णसंख्याही कमी आहे. दरम्यान, याबाबत रुग्णालय व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, “या आंदोलनामध्ये बहुतांश कर्मचारी चतुर्थ श्रेणीतील आहे. तर परिचारिका, लॅब, एक्‍स-रे, एमआरआय यांसह अन्य विभागातील टेक्‍निशियनची संख्या कमी आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर दुसऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रुग्णांची देखभाल करण्यासाठी परिचारिकाही उपलब्ध आहेत.

युनियनकडून करण्यात येणारे आंदोलन अनधिकृत आहे. हे प्रकरण कामगार न्यायालयाच्या कक्षेत आहे. यातील सुमारे 70 टक्के कामगार हे चतुर्थ श्रेणीतील आहेत. आम्ही त्यांच्या अटी आणि शर्थी योग्य प्रमाणात सुधारित केल्या आहेत. मात्र, त्यांच्या काही मागण्या अयोग्य आहेत. याबाबतची पुढील सुनावणी 6 मे रोजी आहे. दरम्यान, रूग्णांच्या सेवेसाठी प्रशासकीय कर्मचारी आणि अन्य कर्मचारी कार्यरत आहे. त्यामुळे रूग्णसेवा सुरळीत सुरू आहे.
– जॉर्ज ईपेन, सीईओ आणि संचालक, जहॉंगिर रुग्णालय

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.