पुणे : …तर झाली असती भाजपची कोंडी

पुणे –  मुख्यसभेत एखाद्या नगरसेवकाने गणसंख्येची मागणी केली असती, अथवा या विषयावर मतदान झाले असते तर भाजपची कोंडी झाली असती. त्यामुळे नगरसेवक गैरहजर राहण्याचा प्रकार गांभीर्याने घेत ही नोटीस बजावण्यात आली आहे.

कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना नगरसेवकांचा ऑनलाइन सभा घेण्यास विरोध होता. तरीही, भाजपने सर्वसाधारण सभा घेण्यास सुरुवात केली आहे. “सभेत प्रस्तावाला विरोध झाल्यास मतदान घेत बहुमताच्या जोरावर विषय मान्य करण्यास कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी वेळेवर सर्वसाधारण सभेसाठी हजर राहावे,’ अशा सूचना भाजपने आपल्या सभासदांना दिल्या होत्या. गुरुवारच्या खास सभेत करवाढीचा प्रस्ताव होता. तो

20 फेब्रुवारीपूर्वी मान्य होणे गरजेचे आहे. त्यामुळे गैरहजर नगरसेवकांचा मुद्दा गांभीर्याने घेण्यात आला आहे.

जनहिताचे निर्णय घेण्यासाठी सर्वसाधारण सभेला उपस्थित राहावे, ही भाजपची शिस्त आहे. आयुक्तांनी मिळकत करात सूचवलेली वाढ फेटाळून पुणेकरांना दिलासा देण्यासाठी खास सभा बोलावण्यात आली होती. पक्षशिस्तीचे पालन न केलेल्या सभासदांना नोटीस बजावून खुलासा मागवण्यात आला आहे.
– गणेश बीडकर, सभागृह नेता, मनपा

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.