पुणे – पैसे देण्यासाठी पाकीट काढताना एका युवकाची 17 हजारांची रोकड सिग्नलवरील तृतीयपंथी व्यक्तीने पळवली. ही घटना मंगळवारी सकाळी घोरपडीत घडली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. सूरज राघवाचारी (22, रा. वानवडी ) यांनी वानवडी पोलिसांत तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज हे दुचाकीवरून घोरपडी परिसरातून चालले होते. त्यावेळी आर्मी पब्लिक स्कूल गेटपुढे सिग्नल लागला. त्यामुळे सूरज थांबले असता, एका तृतीयपंथी व्यक्तीने त्यांच्याकडे 20 रुपये मागितले. त्यावेळी पाकीट काढले असता, तृतीयपंथीने अचानक सूरजचे 17 हजार रुपये काढून घेत पळ काढला. त्याशिवाय दुसऱ्याने त्याला मदत करत रिक्षात बसून ते पसार झाले.