पुणे – शिरूर लोकसभा मतदारसंघात 21 लाख 73 हजार 527 मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 11 लाख 44 हजार तर महिला मतदारांची संख्या 10 लाख 28 हजार इतकी आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी दि.29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये सर्वाधिक मतदार हे हडपसर विधानसभा मतदारसंघात असून याठिकाणी 4 लाख 87 हजार 699 मतदार आहेत. तर आंबेगाव मतदारसंघात 2 लाख 80 हजार मतदार आहेत. शिरूर मतदारसंघात एकूण 2 हजार 296 मतदान केंद्रे आहेत. यामध्ये सर्वाधिक मतदान केंद्र ही हडपसर विधानसभा मतदारसंघात आहे.