पुणे – कंपनीचा विक्रम : एकाच दिवसात साडेनऊ हजार मेगावॅट वीजनिर्मिती

उन्हाळ्यात अखंडित वीजपुरवठा

पुणे – उन्हाळ्यातही नागरिकांना सुखद गारवा देण्यासाठी महावितरण आणि महानिर्मिती या वीजकंपन्यांनी कंबर कसली आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढत महानिर्मिती कंपनीने एकाच दिवसात तब्बल साडेनऊ हजार मेगावॅट वीजनिर्मिती केली आहे.

राज्यात सध्या कडक उन्हाळा जाणवत आहे. त्यातूनच विजेची मागणी वाढत असून ती 20 हजार मेगावॅटच्याही पुढे गेली आहे. तरीही, प्रशासनाच्या वतीने सर्व भागांना नियमित आणि अखंडित वीजपुरवठा करण्यावर भर देण्यात येत आहे. यात वीजकंपन्यांना अपेक्षित यश येत आहे. त्यासाठी वीजनिर्मितीचे सर्व संच पूर्ण क्षमतेने चालविण्यात येत आहेत.

महानिर्मिती वीजकंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अरविंद सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक चंद्रकांत थोटवे, अन्य सर्व संचालक, कार्यकारी संचालक, महानिर्मितीच्या सर्व वीजनिर्मिती केंद्रातील मुख्य अभियंते, विभाग प्रमुख, अभियंते, तंत्रज्ञ आणि कर्मचारी यांच्या प्रयत्नामुळे ही वीजनिर्मिती वाढविणे शक्‍य झाले असे महानिर्मिती वीजकंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.