243 शहरात नवे करोनाबाधित
पुणे – पुणे विभागात करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण 95.03, मृत्यूदर मात्र 2.79 टक्के आहे. दरम्यान, पुणे शहरात मंगळवारी 243 नव्या करोना बाधितांची नोंद करण्यात आली.
पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या विभागातील बाधितांची संख्या 5 लाख 50 हजार 94 झाली आहे. तर पुणे शहराची बाधितांची एकूण संख्या 1 लाख 74 हजार 452 झाली आहे. विभागातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 11 हजार 984 आहे. शहरातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ही 4,950 आहे.
विभागातील एकूण मृत्यू 15 हजार 362 तर शहरात दिवसभरात 12 जणांचा मृत्यू झाला. त्यातील सहा शहराबाहेरील आहेत. यासह मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 4,549 झाली आहे. शहरातील 373 क्रिटिकल रुग्णांपैकी 224 व्हेंटिलेटरवर आहेत.
दिवसभरात 346 जणांना डिस्चार्ज, तर 2278 स्वॅबटेस्ट करण्यात आल्या. आजपर्यंत विभागामध्ये एकूण 30 लाख 83 हजार 948 नमुन्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला आहे.