Pune | कन्टेन्मेंट झोनची संख्या 500च्या घरात; जाणून घ्या क्षेत्रीय कार्यालयानुसार माहिती

पुणे  – शहरातील करोनाची रुग्णवाढ रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. त्याअंतर्गत आता 5 पेक्षा जास्त रुग्ण सापडल्यास संबंधित सोसायटी, इमारत सूक्ष्म प्रतिबंधित झोन म्हणून घोषित केली जाते. या झोनची संख्या अवघ्या आठवडाभरातच 125 ने 497 झाली आहे.

सर्वाधिक प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या आता सहकारनगर-धनकवडी क्षेत्रीय कार्यालय हद्दीत असून त्यांची संख्या 74 वर गेली आहे. त्या खालोखाल वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय हद्दीत 67 आणि औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय हद्दीत 62 प्रतिबंधित क्षेत्र आहेत. यापूर्वी सर्वाधिक प्रतिबंधित क्षेत्र औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत होते. मात्र, आठवडाभरातच धनकवडी-सहकारनगर भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढल्याने ही स्थिती उद्भवली आहे.

सध्या सर्वाधिक रुग्ण हडपसर- मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सापडत आहेत. मात्र, या भागातील मोठया सोसायट्यांमध्येच ही रुग्णवाढ सुरू असल्याने या भागात अद्याप कंटेन्मेंट झोनची संख्या स्थिर आहेत. दरम्यान, शहरातील वरील तीन क्षेत्रीय कार्यालये वगळता इतर 12 क्षेत्रीत कार्यालयांमध्ये 50 पेक्षा कमी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र असून सर्वांत कमी 9 सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र कोंढवा- येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आहेत. तर 10 प्रतिबंधित क्षेत्र कसबा- विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आहेत.

क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील कन्टेन्मेंट झोन

हडपसर-मुंढवा – 41
सिंहगड रस्ता – 31
ढोले-पाटील रस्ता -31
येरवडा-कळस धानोरी – 30
वानवडी- रामटेकडी – 25
बिबवेवाडी – 25
कोथरूड- बावधन – 19
शिवाजीनगर- घोले रस्ता – 16
भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालय – 12

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.